कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अपहरणाचा थरार रुपेरी पडद्यावर…

0
61

गडचिरोली /प्रतिनिधी

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व विद्यमान कॅबिनेट मंत्री  धर्मराव बाबा आत्राम यांच्या अपहरणाचा थरार आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. दिनांक 29 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माहिती पटाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे. EBINA ENTERTAINMENT या कंपनी कडून माहिती पट बनवण्यात आले आहे.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत गडचिरोली जिल्ह्याला विकासाची एक नवीन दिशा दाखवली आहे. त्यासाठी त्यांना नक्षलवाद्यांकडून वारंवार धमक्या ही मिळाल्या आहेत. परंतु वटवृक्षाप्रमाणे त्यांनी खंबीर नेतृत्व दिले आहे.एकदा त्यांचा नक्षलवाद्यांनी अपहरण सुद्धा केला होता. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कारकीर्द येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी आहे हे विशेष..

Previous articleगोंदिया : कांग्रेसच्या निवडणूक निरीक्षक पदी राजकुमार पटले
Next articleजि. प. उच्च प्राथ. शाळा तुलानमाल येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा