जि. प. उच्च प्राथ. शाळा तुलानमाल येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

0
6
1

ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) : कवी श्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून जि. प. उच्च प्राथ. शाळा तुलानमाल (पं. स. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून “ताटवाकार” कवी संतोष मेश्राम सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय कुंभारे सर हे होते.

कवी संतोष मेश्राम सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी साहित्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कवितेचा जन्म कसा होतो, कवी कसा घडतो या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दरम्यान शाळेच्या विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षक बालसाहित्यिक गुलाब बिसेन सर यांच्या बालकवितांचे वाचन केले. शाळेतील विषय शिक्षक जगदीश मेहेर सर, चंद्रशेखर चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विजय कुंभारे सर जगदीश मेहेर सर चंद्रशेखर चौधरी सर, टीकाराम बोकडे सर, गुलाब बिसेन सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. यादीती बोरकर (इ. ७ वी) आणि कु. दीप्ती शेंदरे (इ. ६ वी) यांनी केले.