अमरावती मार्गाच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या 6 महिन्यापासून बायपास.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : गजानन पोटदुखे
दिनांक :- 29 फेब्रुवारी 2024
देवळी शहरातील बस स्थानक 7 ते 8 वर्षा पासून फारच मंद गतीने विकास काम सुरू आहे. चार मुख्यमंत्यांचा कार्यकाळ होऊन सुद्धा काम अपूर्ण स्थितीत आहे.प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, उभं राहायला सुद्धा जागा उपलब्ध नाही . तात्पुरत्या स्वरूपाचे महिला आणि पुरुष याकरिता प्रसाधन सुद्धा नाही. आणि जे आहे त्यामध्ये महिने गिनती कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही. देवळी बस स्थानकाचे बाहेरील प्लॅटफॉर्म चे काम पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये बसची आवक-जावक सुरळीत होऊ शकते. प्रवाशांना विद्यार्थ्यांना, बसण्या उठण्याची जागा उपलब्ध झालेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या बसेसला आत मध्ये प्रवेश देण्यात यावा, जेणेकरून प्रवासाची हेडसाड होणार नाही. तसेच पुलगाव, अमरावती, मोर्शी अकोला, शेगाव,बुलढाणा जाणाऱ्या येणाऱ्या बसेस पुलगाव चौकातून जातात . प्रवाशांना तिथेच उतरून दिला जाते. प्रवाशांना त्या मार्गाने जावयाचे असल्यास पुलगाव चौक येथे जावे लागते. देवळी बस स्थानकावर यापैकी कोणत्याही बसेस येत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन या मार्गावरील सर्व बसेस देवळी बस स्थानकावर वळत्या करण्यात याव्या. अशी नागरिकांची मागणी आहे.

