अनुकंपा नियुक्ती प्रकरण : मुख्याध्यापकास उच्च न्यायालयाचे कारणे दाखवा नोटीस

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

प्रकरण असे की, “श्री समर्थ रामदास शिक्षण संस्था आमगाव” द्वारा संचालित “समर्थ विद्यालय तिगांव” येथे दिगंबर धोंडोजी पटले हे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिनांक 7 नोव्हेंबर 2020 ला सहाय्यक शिक्षक पटले यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या पत्नी सपना दिगंबर पटले यांनी संस्थेकडे शासनाच्या नियमाप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी संस्थाकडे अर्ज केला, त्यानुसार संस्थेने 23.1. 2023 ला सपना दिगंबर पटले यांना अनुकंपा वर नियुक्ती आदेश दिला. परंतु मुख्याध्यापक ए. बी. शेंडे यांनी संस्था सचिवांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.

त्यामुळे सपना पटले यांनी व्यथित होऊन अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळावी यासाठी नागपूर खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक 1338/2024 दाखल केली, त्यावर माननीय न्यायालयाने प्रतिवादी क्रमांक ३ मुख्याध्यापक ए. बी. शेंडे, 2020 समर्थ विद्यालय तिगाव यांना पटले ला रुजू करून का घेतले नाही ? म्हणून दंड का करण्यात येऊ नये, असे कारणे दाखवा देण्यात आले आहे.
याचिका कर्त्याच्या बाजूने कोणीही उपस्थित नसताना देखील सुद्धा माननीय न्यायालयाने सदरचे आदेश पारित केले हे विशेष उल्लेखनीय आहे.