टप्पा वाढ मिळेपर्यंत अंशतः अनुदानित शिक्षकांचा इयत्ता १० वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार

0
8
1

अहेरी /प्रतिनिधी 

०३ जानेवारी २०२४ पासुन मुंबई येथील आझाद मैदानावर अंशता अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदानाचा पुढिल वाढिव टप्पा मिळावा या मागणी सह इतर मागण्यांकरीता बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून अद्याप पर्यंत या सदरील मागण्यांबाबत शासन स्तरावरून कोणतीही दखल घेण्यांत आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विभागिय मंडळामध्ये  इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार सुरु आहे.सर्व अंशताः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य होउन दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासुन प्रत्येक वर्षी अनुदानाच्या वाढिव टप्याच्या शासन निर्णय निर्गमित करे पर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यांत येत असल्याबाबतचे निवेदन आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास तहसीलदार अहेरी व गटशिक्षणाधिकारी अहेरी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना समन्वयक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष नागापुरे , उपाध्यक्ष प्रणय येगलोपवार, कोषाध्यक्ष आर जे शेख, सचिव सदानंद भरडे, यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते ..