महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेची मागणी
गोंदिया / धनराज भगत
अकोल्यातील सभेत दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझे काहीही करू शकणार नाहीत, पोलीस फक्त माझे भाषण रेकॉर्ड करू शकतात आणि जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार . आमच्या राज्यात ते आमच्यावर काही करू शकणार नाही राहायचं आहे त्यांना जागेवर अशा प्रकारे पोलिसांचा अपमान करणारे विधान केले आहे.
समाजासाठी दिवस रात्र कार्य करणाऱ्या पोलिसांचे अपमान पाहून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर यांच्या द्वारे जिल्हाधिकारी साहेब गोंदिया, पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब देवरी यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक 5.3.2024 पर्यंत वाचाळवीर आमदार नितेश राणे यांनी पोलीस विभागाची व त्यांच्या परिवाराची जाहीर माफी मागावी अन्यथा संघटनेतर्फे संपूर्ण विदर्भात आमदार नितेश राणे च्या विरोधात साखळी उपोषण करणार असल्याचे जयश्री पुंडकर यांनी यावेळी सांगितले आहे. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस संघटने चे अध्यक्ष योगेश पारधी व पदाधिकारी ,उमाकांत सरोदे, राजू खामले, छोटेलाल मिश्रा,दिलीप यादव आणि महाराष्ट्र पोलीस बाइज संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी ठाकरे, देवरी तालुका अध्यक्ष सुजित अग्रवाल ,देवरी तालुका महिलाअध्यक्ष लक्ष्मी मेश्राम ,सीमा मळावी ,रंजना तवाडे, आरती जांगळे, वंदना बैस, मंजुषा वासनिक, सतीश वाघ ,अरुण आचले,गणेश मानकर, बीसराम सलामे योगेश मेश्राम ,सचिन भांडारकर,आदी उपस्थित राहुन आमदार नितेश राणे चा निषेध व्यक्त केला.

