विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चुल्हाड येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड

0
63

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे दिनांक १ मार्च रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्षपदी जितेंद्र तुरकर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर संस्था 13 सदस्यीय असून दिनांक 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत डॉ.जितेंद्र तुरकर, जितेंद्र चौधरी, दिवालु गुडेवार, प्रमिला अंबुले, अनुबाई पटले, चिंधु पारधी, संजय राहंगडाले, संजय पटले, राधेश्याम तुरकर, डॉ. अशोक पटले, देवेंद्र बाणेवार, बालचंद बोरकर, रामकुवर सोनेवाने निवडून आले होते. दरम्यान आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्व संचालकांनी सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ. जितेंद्र तुरकर व उपाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस. बी. शेंद्रे यांनी कामकाज सांभाळले. याप्रसंगी सचिव बी.ए. चामट, माजी सरपंच गुरुदेव पारधी माजी उपसरपंच सहसराम पारधी हावशीलाल पारधी, शोभेलाल पटले तसेच गावातील मान्यवरांनी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleआमदार नितेश राणेवर तत्काळ गुन्हा दाखल करा – जयश्री पुंडकर
Next articleगुमशुदा की तलाश