गोंदिया / धनराज भगत
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सरपंच मेळाव्यात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती शपथ घेण्यात आली. सर्व सरपंच व पदाधिकारी यांनी तथा नागरिकांनी निष्पक्ष मतदान करावे तथा इतरांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र राखु. निवडणुकीत निर्भयपणे तथा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु अशी यावेळी शपथ घेण्यात आली.
न्यू ग्रीनलॅन्ड लॉन गोंदिया येथे (ता.1) जिल्हास्तरीय सरपंच मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, अर्थ व बांधकाम समिती सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, समाज कल्याण समिती सभापती पूजा सेठ, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, सालेकसा पंचायत समितीच्या सभापती प्रमिला गणवीर, देवरी पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार, जिल्हा परिषदेचे गटनेते लायकराम भेंडारकर, गटनेते सुरेश हर्षे, आनंदा वाढीवा, जिल्हा परिषद सदस्य उषा मेंढे, अंजली अटरे, जगदीश बावनथडे, प्रविण पटले, विजय उईके, रितेशकुमार मलघाम, वंदना काळे, हनवंत वट्टी, राधिका धरमगुडे, चतुर्भूज बिसेन, उषा शहारे, लक्ष्मी तरोणे, कविता रंगारी, विमल कटरे, राधिका धरमगुडे, अश्विनी पटले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे उपस्थित होते.
दरम्यान मतदान जागृतीसाठी प्रश्नमंजुषा सुद्धा घेण्यात आली. निवडणूक, मतदानाचे नियम, कायदे व कलमांवर विचारलेल्या प्रश्नांना सरपंचांनी चांगलीच दाद दिली. अचूक उत्तर देणाऱ्या सरपंचांना यावेळी थेट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सरपंच मेळाव्यात मतदार जनजागृतीचे विविध फलकही लावण्यात आले होते. यामध्ये वोट डालकर आयेंगे-अपना फर्ज निभाऐंगे, नए भारत के निर्माण में अपना योगदान दे-मतदान जरुन करे, आपका मतदान ही है लोकतंत्र की जान-वोट जरुर करे-बढाऐ भारत की शान, मतदान केंद्र जाऊँगा-देश का उज्ज्वल भविष्य बनाऊँगा अशाप्रकारचे सेल्फी पाईंट लावून मतदान जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे ‘सेल्फीपाईंटने‘ सर्वांनाच आकर्षित केले. यावेळी जलसंपदा विभागाच्या सहायक अभियंता तथा ‘स्वीप‘च्या नोडल अधिकारी शिखा पिपलेवार व चमू प्रामुख्याने उपस्थित होते.

