वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
रत्नापूर येथे विविध विकास योजनेतुन रु. 94 लक्ष 38 हजार किमतीच्या विविध विकास कामाचा भुमीपूजन कार्यक्रम संपन्न.
देवळीः ग्रामीण भारत देशातील बहुतांश लोकसंख्या गावखेडयात आहे. ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. आज जर देशाचा विकास करावयाचा असेल तर सर्वप्रथम ग्रामीण भागातील प्रत्येक कुंटुंब आत्मनिर्भर व विकसीत होणे आवश्यक आहे, गावाच्या विकासासाठी इच्छाशक्ती महत्वाची असते, रत्नापुर गावामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यामुळे रत्नापूर गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे, या अगोदर विविध विकास योजनेतुन विकास कामे झाले व आज केन्द्र व राज्यसरकारच्या विविध विकास योजनेतुन आज येथे 95 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भुमीपूजन संपन्न होत आहे, हा विकास गावाच्या विकासासाठी महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.
रत्नापूर येथे विविध विकास योजनेतुन रु. 94 लक्ष 38 हजार किमतीच्या विविध विकास कामाचा भुमीपूजन कार्यक्रम खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते व जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाने, माजी जि.प. उपाध्यक्ष सौ. वैशाली येरावार, माजी सभापती मिलिंद भेंडे, दशरथ भुजाडे, राजेन्द्र रोकडे, सरपंच सुधिर बोबडे, उपसरपंच सौरभ कडू, शिरपूर सरपंच रवींद्र भनारकर, ईसापुर सरपंच नितीन गंभीर,मुरदगाव (खोसे) सरपंच विलास सुरसे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सदस्य प्रशांत सावंकार, रत्नापुर भाजप अध्यक्ष सुनील खडसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोयर,संजय बिजवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी व जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाने, माजी जि.प. उपाध्यक्ष सौ. वैशाली येरावार, माजी सभापती मिलिंद भेंडे, दशरथ भुजाडे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच प्रास्तावीक सरपंच सुधीर बोबडे यांनी केले, संचालन अविनाश जाधव, उपस्थितांचे आभार प्रशांत सावंकार यांनी मानले, कार्यक्रमाला ग्रामपंचायत वि.का.से.स.सो. अध्यक्ष किशोर मुडे, सदस्य देविदास वाघ, सदस्य सौ. सुनिता सडमाके, सदस्य सौ.विद्या ठाकरे, सदस्य अयुब अली, सदस्य सौ. छाया सोनवणे, विद्या ठाकरे, जि.प शाळेचे शिक्षक श्रीराम सहारे चेतन फलके,मनोज भोयर, सुमित पंडित,दीपक धुमाळ,आकाश निंबोळकर,उमेश आखुड,सागर कडु,अजय वाघ जिवन महाजन समीर वाघ, यशवंत वाघ, स्वप्नील कडु, राजेश आखुड,गजानन सडमाके, मंगेश कडु, सतीश बोबडे, समीर सडमाके, प्रथमेश भोयर,खुशाल शेंदरे, किरण राऊत, अक्षय आखुडकार, राम राऊत, रितेश भागवत, जगदीश आखुडकार, संदीप कुमरे,वर्षी राऊत विशाखा आखरे, कल्पना शेंदरे,सिमा आखुड,शारदा बोबडे, संजीवनी आखरे, पल्लवी आखुड, उज्वला मानकर व रत्नापूर येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.