चार सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

0
46
1

गोंदिया / धनराज भगत

 जनतेच्या जिविताची व मालमत्तेची सुरक्षितता तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून प्राप्त अहवालानुसार सौरभ बाळकृष्ण गायधने वय 20 वर्ष रा. मुरदोली ता. देवरी, विकेश चरणदास चौरे वय 36 वर्ष रा. मरकाखांदा ता. सालेकसा, सुभाष हिरालाल डोंगरे वय 40 वर्ष रा. कवळी ता. सालेकसा, संतोष मदनलाल अग्रवाल वय 42 वर्ष रा. साखरीटोला ता. सालेकसा या चार इसमांना गोंदिया जिल्ह्याबाहेर तसेच देवरी उपविभागातून (तालुका देवरी, आमगाव व सालेकसा) तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी सत्यम गांधी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.