महिला अर्बन को आपरेटिव्ह महिला बँकेच्या अध्यक्षपदी माधुरी नासरे, उपाध्यक्षा प्रियाताई हरिणखेडे यांची निर्विरोध निवड

0
4
1

गोंदिया / धनराज भगत

नुकत्याच पार पडलेल्या गोंदिया महिला अर्बन को आपरेटिव्ह महिला बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली होती. यात माधुरी नासरे, प्रियाताई हरिणखेडे, संचलिका द्वारकाताई सावंत, आशाताई पाटील, स्नेहल नासरे, लता अवस्थी, संगीता तिवारी, नेहा तुरकर, अमीना भाईदानी, माधवी साखरे, रूपा मिश्रा, रेखा दवे, ललिता यादव यांची निर्विरोध निवड करण्यात आली.

दि २२ फेब्रु. ला अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुद्धा अध्यक्षापदी माधुरी नासरे, उपाध्यक्षा पदावर प्रियाताई हरिणखेडे यांची एकमताने निर्विरोध निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन व पक्ष पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षा व बँकेच्या संचालिका यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या अविरोध निवडीबद्दल सर्व संचालक मंडळाने खा.श्री प्रफुल पटेलजी, सौ. वर्षाताई पटेल, माजी आमदार श्री राजेंद्र जैन व सर्व मतदारांचे आभार मानले.