संत मानवदयाल विद्यालय अहेरी येथे सावित्रीच्या लेकींना मिळाल्या सायकली …

0
4
1

अहेरी /प्रतिनिधी

मानव विकास मिशन अंतर्गत बाहेरगावून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना शासनामार्फत सायकल वाटप योजना सुरू आहे. त्या अंतर्गत संत मानवदयाल विद्यालय अहेरी येथे आठवी ते दहावीच्या 34 विद्यार्थिनींना दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला सायकलीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगीं केंद्राचे केंद्र प्रमुख चिलवेलवार सर,गटसाधन केंद्र अहेरीचे नागरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ठाकरेजी तसेच शाळेचे मुख्याध्यापक येगोलपवार सर आणि समस्त शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.