अनिहानगर वसाहतीत घाणीचे साम्राज्य

0
2
1
गोंदिया/ धनराज भगत

आमगाव  नगर परिषद अंतर्गत बनगाव येथील नहर रोड, अनिहा नगर, डॉ, चांदशी यांच्या मागील परिसरातील गटारे अनेक महिन्यानंपासून तुडुंब भरून आहेत, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.या ठिकाणी लोकशाहीकार्यशैली अस्तित्वात नसून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.

सदर परिसरात महामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगरातील स्वछतेकडे प्रशासक तहसीलदार रविंद्र होळी यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव फुंडे, छोटू बावणकर, गीता येळे, प्रकाश राय, राधेश्याम टेंभरे, नीरज पटले, वामन राऊत, कृष्णा पटले, तिलांजली टेंभरे आदींनी केली आहे.