साढ़े तीन लक्ष मतदार असलेल्या पोवार समाजाने दिला निर्वाणीचा इशारा

0
56

गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रात पोवार समाजाचे तब्बल ३.५० लक्ष मतदार…

भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी…

जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या नावाची चर्चा…

गोंदिया / धनराज भगत

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. अश्यातच गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात तब्बल ३.५० लाख मतदार असलेल्या पोवार समाजाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या निवडणुकीत पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे. गोंदिया-भंडारा लोकसभेची जागा महाविकास आघाडी कडून काँग्रेसकडे तर महायुतीकडून भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गोंदिया- भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पोवार समाज बांधव असून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पोवार समाजाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी १९८० पासून तर २००९ पर्यंत पोवार समाजाचे ४ खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत.

लोकसभेवर निवडून गेलेले पोवार समाजाचे चार खासदार

● १९८० आणि १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पोवार समाजाचे नेते केशवराव पारधी हे निवडून आले होते.

● १९८९ आणि १९९१ च्या निवडणुकीत भाजपकडून पोवार समाजाचे नेते खुशाल बोपचे हे निवडून आले होते.

● १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत भाजप पक्षाकडून पोवार समाजाचे चुन्नीलाल ठाकुर हे निवडून आले होते.

● २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत भाजप पक्षाकडून पोवार समाजाचे नेते शिशुपाल पटले हे निवडून आले होते.

त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पोवार समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे पोवार समाज बांधवांनी नाराजी व्यक्त करत २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये आमचाच उमेदवार हवा अशी मागणी केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या राजा भोज यांच्या जयंतीनिमित्त महारॅली काढत पोवार समाज बांधवांनी शक्ती प्रदर्शन देखील केले होते. त्यामुळे आता आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला राष्ट्रीय पक्ष पोवार समाजाच्या प्रतिनिधीला निवडणूक लढण्यासाठी संधी देतो काय ? याकडे पोवार समाजाचे लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या नावाची चर्चा

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजताच… कोणता उमेदवार रिंगणात असेल याबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत… यात गोंदिया जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेम्भरे यांच्या नावाची देखील चर्चा जोरात सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या संजय टेंभरे यांना राजकारणाचा चांगला अभ्यास असून प्रशासनावर देखील त्यांची चांगली पकड आहे.. तर विशेष म्हणजे ते सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता नेहमी तत्पर असतात.. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावाचा विचार करून त्यांना लोकसभेची उमेदवारी देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous articleअनिहानगर वसाहतीत घाणीचे साम्राज्य
Next articleदेवळी शहरात आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन……..