अंगणवाडी केंद्र नागेपली येथे पोलिओ लसीकरण संपन्न

0
3
1

अहेरी /प्रतिनिधी

 तीन मार्च रोजी संपूर्ण राज्यभर पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली होती. शून्य ते पाच वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली अंगणवाडी केंद्रातही पोलिओ लसीकरण तीन मार्च रोजी करण्यात आले. सदर लसीकरणाचा परिसरातील बालकांनी लाभ घेतला. सदर लसीकरणाला अहेरीचे सीडीपीओ राहुल वराठे यांनी भेट दिली. यावेळी अंगणवाडी सेविका अर्पना प्रकाश चुनारकर,काम्युनिटी हेल्थ ऑफिससर प्रीती चालुलकर, रंजना पागडे उपस्थित होते.