शिव मंदिर पंचगंगा देवस्थान कोटरा येथे महाशिवरात्रि पर्व ७ मार्च पासून

0
46

गोंदिया/ धनराज भगत

सालाबाद प्रमाणे यावर्षी ही शिवरात्रीच्या पवित्र उत्सवानिमित्त शिव मंदिर पंचगंगा देवस्थान कोटरा (सालेकसा)च्या वतीने 7 मार्च 2024 ते 8 मार्च 2024 या कालावधीत शिव मंदिर पंचगंगा देवस्थान तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळी अखंड ज्योत प्रज्ज्वलन व शिवपुराण भजन कीर्तन, हवन पूजन तसेच दहिकाला महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
शिव मंदिर पंचगंगा देवस्थान येथील आयोजकाँनी समस्त शिव भक्तांना महाशिवरात्रि पर्व निमित्त पर्यटन स्थळी भेट देवून यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.