गोंडी भाषा जागतिक स्तरावर पोचविली।

0
5
1

 

ऊषाकिरण आत्राम ह्या गोंडी भाषेच्या साहित्यकार आहेत,त्यांनी साहित्य अकादमीचे माध्यमातून गोंडी भाषेला जगातील अनेक भाषेसोबत गोंडी भाषेला पोचविले।

दिं 11ते 15मार्च 2024 ला सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार कडुन दिल्ली येथे जागतिक साहित्य उत्सव संपन्न होत आहे।देशविदेशातील अनेक दिग्गज लेखक,कलाकार संगितकार ,पत्रकार चित्रकार, निर्माते, अकादमीचे अध्यक्ष मा कौशीक,सचिव श्रीनिवास ,,व सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे प्रमुख उपस्थितीत हा उत्सव संपन्न होत आहे।अशा या जागतिक साहित्य उत्सवात गोंदिया जिल्ह्य़ातील कचारगड येथील गोंडी भाषेच्या अभ्यासक व लेखक ऊषाकिरण आत्राम ह्यांना दि 13मार्च चे कविसंमेलनाचे अध्यक्ष पद भुषविण्याचा बहुमान मिळाला आहे।ऊषाकिरण आत्राम या गोंडी, हिन्दी,मराठीत कविता कथा,नाटक,वैचारिक लेखन करतात, गोंडवाना दर्शन च्या मुख्य संपादक आहेत। त्यांच्या कथा,कविता,नाटक महाराष्ट्रातील 13विध्यापिठात,व माध्यमिक, प्राथमिक बालभारती अभ्यासक्रमात असुन इंग्रजीत, बंगाली,उर्दु हिन्दी मध्ये ही कथा,कविता अनुवादित आहे।अनेक पुरस्कार प्राप्त या लेखिकेनी गोंडी भाषेतुन कविता कथा साहित्य अकादमीचे आंतरराष्ट्रीय संमेलन, शिमला ,कोलकोता, मुंबई भोपाल आदि ठिकाणी गोंडी भाषेतून प्रतिनिधित्व केले आहे। जगातल्या अनेक भाषा व बोली मध्ये गोंडी भाषेला जागतिक स्तरावर पोचविण्याचे मोठे काम लहानशा आदिवासी धनेगाव गावात राहुन त्यांनी केले आहे।त्यांच्या या कामाबद्दल व निवडी बध्दल मानिक गेडाम, शशी तिवारी,सतिश पारधी,मालती किनाके,सविता बेदरकार, जनार्दन गोंड, कन्नया उईके,नंदकिशोर नेताम, बिच्चु वड्डे,परमेश्वर नेवारेनी अभिनंदन केले आहे।

12मार्च ला त्या दिल्ली साहित्य संमेलनात सहभागी होत आहे।