सालेकसा तालुका जलयुक्त शिवार पासून वंचित

0
41

५३ गावांची यादी धुळखात…

लोक जन लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष…

सालेकसा/ बाजीराव तरोने

पूर्व विदर्भात गोंदिया महाराष्ट्र शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी नक्षलग्रस्त सभेचे क्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या सालेकशा तालुक्यात सर्वाधिक शेती करणारे लोक या भागात असून सुद्धा मृद.व.जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 28/2024 यानंतर महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके असून या आठ तालुका पैकी साले कसा तालुक्याला पूर्णच वंचित ठेवून कृषी विभागाकडून येणारा निधी सुद्धा आलेला नसून ही एक मोठी शोकांतिका आहे व शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे यामध्ये जन लोकप्रतिनिधी शासन प्रशासन यात विविध विभागाचे अधिकारी सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे
विशेष म्हणजे एकीकडे शासन प्रशासन म्हणतो की शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ होणार नाही व त्यांना पूर्णपणे सोयीसुविधा मिळाले पाहिजे तर दुसरीकडे शासन प्रशासनच शेतकऱ्यांच्या विरोधात असून गोंदिया जिल्ह्यातील चालले कसा तालुक्यात हा कशामुळे वगळण्यात आलेला आहे ही कोणी सांगायला तयार नाही तसेच गोंदिया जिल्ह्यात साले कसा हा तालुका नाही का असाही संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून केला जात आहे जर आदिवासी सालेकसा तालूका शासन प्रशासन लक्ष देत नसेल तर हा तालुका जवळच्या छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश राज्यात यांना समावेश करण्यात यावा असेही मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे सालेकसा तालुक्यात जवळपास आज 24000 ते.25000.शेतकरी आहे साले कसा तालुक्यात अंदाजे एकंदरीत 53 गावाची यादी महाराष्ट्र कृषी विभाग यांना पाठवण्यात आले आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून आजही शेतकरी जलयुक्त शिवार अभियान योजनेपासून वंचित असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे यामध्ये सालेकसा तालुक्यात 41 ग्रामपंचायत व 92 गावाचा समावेश असून त्यापैकी जलयुक्त शिवार अभियान योजनेत 53 गावाची यादी शासन स्तरावर पाठवलेली आहे परंतु अद्यापही शासनाने निधी न दिल्यामुळे ही फाईल धूडखात आहे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री शासन प्रशासन आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य व इतर शासन प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सालेकसा तालुक्यातील 53 गावातील जलयुक्त शिवार अभियानाला निधी देण्यात यावा अशी मागणी ही तालुका शेतकरी वर्गाकडून केली जात आहे
प्रतिक्रिया:
भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता जलयुक्त शिवार अभियाना करिता गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत त्या आठ तालुक्यांपैकी 57 कोटी रुपये जिल्ह्याकरिता मागणी करण्यात आली होती परंतु शासनाने आतापर्यंत सात कोटी चाळीस लाख रुपये दिले आहे आणि यामध्ये गोंदिया जिल्ह्यात ११८६ कामे घेतली असून. दि 5.2.2024 च्या शासन निर्णया नुसार जुनेच सदस्य सचिव जिल्हा कृषी अधीक्षक राहतील अशा शासन निर्णयात नमूद केले आहे व टप्प्याटप्प्याने कामे घेतले जातील
– सत्यजित राऊत कार्यकारी अभियंता ल.पा. विभाग जिल्हा परिषद गोंदिया
Previous articleमानवी साखळीद्वारे उद्या जिल्हाभरात होणार मतदान जागृती
Next articleजुन्या पेन्शनच्या उर्वरित लढ्यासाठी तयार रहा : संतोष सुरावार यांचे शिक्षकांना आवाहन