जुन्या पेन्शनच्या उर्वरित लढ्यासाठी तयार रहा : संतोष सुरावार यांचे शिक्षकांना आवाहन

0
63

चामोर्शी :प्रफुल कोटंगले

महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १०८१ मधील नियम १९ व २० (२)नुसारच जुनी पेन्शन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सन २००८ पासून सातत्याने मागणी करत प्रसंगी मोर्चे आंदोलने ही केली आहेत. १४-मार्च २०२३ ते २० मार्च २०२३ च्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलाच. त्याचबरोबर १२ डिसेंबर २०२३ नागपूर येथे एक दिवसाच्या आंदोलनात हजारो बांधवांच्या समवेत शिक्षक परिषद सामील झाली. त्याचबरोबर १४ डिसेंबर २०२३ च्या समन्वय समितीच्या संपातही सक्रिय सहभाग घेतला. थोडक्यात शिक्षक परिषदेने स्वतंत्र आंदोलने मोर्चे याद्वारे सरकार पुढे हा प्रश्न मांडला त्याचबरोबर राज्य पातळीवर समन्वय समितीच्या माध्यमातून सक्रिय सहभागी घेतला. या सर्वाचा परिपाक म्हणून राज्याचे मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिनांक १ मार्च २०२४ रोजी विधानसभेत सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची घोषणा केली व एनपीएस साठी पर्याय दिला आहे . कर्मचाऱ्यांचा आर्थिक व सामाजिक हक्क सुरक्षित ठेवण्यात आला आहे असे जरी मुख्यमंत्री म्हणत आहेत.परंतु सदर पेन्शन योजना मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमीत कमी वीस वर्षे सेवा आवश्यक आहे तेव्हाच शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तीवेतन देण्याचे मान्य केले. परंतु कर्मचाऱ्याचे दरमहा १० %रक्कम कपात होणार आहे. व ही कपात रक्कम सेवनिवृतीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.

उर्वरित खालील मागण्या अजूनही स्पष्ट नाहीत आणि या मागण्या संदर्भात शिक्षक परिषद जुन्या पेन्शनचा लढा हा सुरूच ठेवणार आहे.

एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शाळेतील तुकडी वरील शिक्षक शिक्षकेतरांना १९८१ची जुनी पेन्शन योजना मिळावी

कर्मचारी मासिक १० %रक्कम कपात सेवानिवृत्ती नंतर व्याजासह मिळावी.

स्वेच्छा निवृत्ती बाबत सकारात्मक उल्लेख हवा.

कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर यांना १९८१मधील तरतुदीनुसार अंश राशीकरण मिळावे.

असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, जिल्हा अध्यक्ष अनिल नूतिलकंठावार, जिल्हा कार्यवाह सागर आडे, जिल्हा सहकार्यवाह मनोज बोमनवार, जि.एच. रहेजा, देविदास नाकाडे, कोषाध्यक्ष जीवन उईके, संघटनमंत्री विश्वजित लोणारे व गणेश तगरे, सह संघटनमंत्री शिवदास वाढणकर, संजय नागापुरे, महिला आघाडी प्रमुख मृणाल तुम्पल्लीवार, सह महिला आघाडी प्रमुख जयश्री लोखंडे, नागपूर विभाग शिक्षक संदेश प्रमुख घनश्याम मनबतुलवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत बुरांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleसालेकसा तालुका जलयुक्त शिवार पासून वंचित
Next articleमहागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मंत्री,धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती.