आदर्श विद्यालय तर्फे मतदार जनजागृती साठी मानव शृंखला

0
90

गोंदिया / धनराज भगत

आगामी लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाच्या हक्क बजावावा व गोंदिया जिल्ह्यात मतदानाच्या टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवत असून गुरुवार दि. ७ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता आमगाव येथील आदर्श विद्यालया तर्फे मानवी साखळी द्वारे मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यां द्वारे आमगाव शहरातील गांधी चौक ते डॉ बाबासाहेबआंबेडकर चौक दरम्यान दोन मानवी शृंखला तयार करण्यात आल्या. मतदार जागृती हा या मानव शृंखलेचा मूळ उद्देश्य आहे. याआधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय मैदानात ईव्हीएम व व्हीव्हीपीएटीची मानव शृंखला सादर केली.
आमगाव चे तहसीलदार मा. रवींद्र होली, नायब तहसीलदार मा. गुणवंत भुजाडे, मा. सतीश वेलाटी तसेच आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश एम. राऊत ,उपमुख्याध्यापक डी. बी. मेश्राम,पर्यवेक्षक यु एस मेंढे व सर्व शिक्षक वृंद याप्रसंगी मानवी शृंखलेत सहभागी झाले.
मतदार जागृती घोषवाक्य, फलक व बॅनरच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असा संदेश या मानव शृंखलेतून देण्यात आला.
Previous articleमहागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मंत्री,धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती.
Next articleमतदार जनजागृती निमित्ताने मानवी साखळीचे आयोजन