मतदार जनजागृती निमित्ताने मानवी साखळीचे आयोजन

0
7
1

गोंदिया / धनराज भगत

भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित, श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगांव येथे आज सकाळी १०.०० वाजता आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार जनजागृती करण्यासाठी मानव साखळीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पार पाडण्यात आले होते यामध्ये डी. फार्म व बी. फार्म च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मानवी साखळीचे आयोजन आमगाव मधील रीसामा येथे महाविद्यालया जवळील चौकात घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ .तुलसीदास निंबेकर, देवेंद्र बोरकर, नरेंद्र कावळे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी परिश्रम घेतले.