भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांकडून “एकच वादा अजित दादा” च्या गर्जनेत भव्य स्वागत

0
59

गोंदिया / धनराज भगत

      “आज सडक/अर्जुनी स्थित पंचायत समितीच्या समोरील पटांगणावर भव्य कार्यकर्ता मेळावा व किसान संमेलन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार  राजेंद्र जैन, आमदार  मनोहर चंद्रिकापुरे, आमदार  राजुभाऊ कारेमोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार  मनोहर चंद्रकापुरे यांच्या कार्याचा आढावा म्हणून “मनोहर पर्व” पुस्तकाचे प्रकाशन सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.”

घोषणाबाज नाही तर वचनपूर्ती करणारे – मा. अजित दादा पवार

फुले, शाहू, आंबेडकरांची, विचारधारा न सोडता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास व योजनांचा फायदा पोहोचवण्याचा प्रामाणिक हेतू आहे त्यासाठीच धान उत्पादक शेतकऱ्यांना सन्मानजनक बोनस, दुधाचे भाव कमी झाल्यानंतरही दुधाला प्रति लिटर वाढीव भाव, दुष्काळ गारपीट किंवा अन्य नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रामाणिक हेतू ठेवून, सिंचनाच्या क्षमतेत वाढ अशी अनेक कामे प्रामाणिकपणे करीत असतो. लोकांची रखडलेली अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेचा वापर झाला पाहिजे हीच खूणगाठ कायम मनात बांधलेली असते.

सदैव विकासाचा निर्धार – खा.श्री प्रफुल पटेल

जिल्ह्याच्या प्रथम आगमनार्थ धडाडीचे व दमदार नेतृत्व राज्याचे अर्थमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांचे स्वागत करीत कर्मभूमी असलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा पाढा वाचला. दोन्ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना बोनस, शिक्षणाच्या क्षेत्रात व आरोग्य सेवा सामान्य माणसाला उपलब्ध व्हावी व वैद्यकिय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावी याकरिता मेडिकल कॉलेज, लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात आणलेले प्रकल्प व विकासासाठी अविरत भविष्यातही प्रयत्न करणार. असा विकासाचा पाढाच श्री पटेल यांनी वाचला. भाजपची मैत्री ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी केली भंडारा गोंदिया जिल्ह्याला विकासाच्या निरंतर प्रवाहात आणणे आणि येथील जनतेला सर्व घटकांना योजनांचा लाभ व्हावा हाच एक प्रामाणिक हेतू ठेवून मैत्री करण्यात आली. आगामी लोकसभेच्या निवडणूकीला येथील उमेदवारी ज्या पक्षाकडे जाईल त्यांचा युती धर्मानुसार प्रामाणिकपणे काम करायचे आहे.
याप्रसंगी गोंदिया व भंडारा जिल्हयातील हजारोंचा संख्येने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्या, शेतकरी बंधू, व पत्रकार उपस्थित होते.
Previous articleमतदार जनजागृती निमित्ताने मानवी साखळीचे आयोजन
Next articleभजेपार ग्राम पंचायतीला वर्षभरात 53 लाख 60 हजार रुपयांची बक्षीसे…