श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन साजरा

0
76

गोंदिया / धनराज भगत

श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी शैक्षणिक परिसरातील श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगांव येथे आज जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन्स ने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिवस साजरी करण्याची सुरुवात केली होती. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती व इतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रमुख पाहुण्या मिस. मनीषा कठाने, मिस सिखा पिपलेवार, उपप्राचार्य डॉ. टी. पी. निंबेकर यांच्या उपस्थितीत स्वागत करून पार पाडण्यात आला.
” स्त्री एक भविष्य आहे” आणि ते साध्य होईपर्यंत महिलांना समान बुद्धिमत्ता पूर्ण संधी, प्रतिनिधित्व आणि प्रभाव असलेल्या भविष्याचे स्वप्न पाहण्यापासून आपण थांबवू शकत नाही असे प्रतिपादन शिखा पिपलेवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं तसेच इतिहासात स्त्रियांचे समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि भविष्यात अजूनही मोठे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ही कल्पना मिस. मनीषा कठाने यांनी विद्यार्थ्यांना समजवून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची उकरे तर आभार प्रदर्शन मेघना पाटेवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राणी भगत, प्रा. जितेंद्र शिवणकर, प्रा. परमेश्वर वानखेडे, प्रा. अनिल सोरी, रोशनी अग्रवाल, मनीषा बिसेन, दीक्षा खोब्रागडे व डी. फार्म आणि बी. फार्मचे विद्यार्यांनी केले.