गोंदिया- भंडारा लोकसभा प्रफुल्ल पटेल लढणार का…???

0
6
1

गोंदियातील पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा लढण्याची इच्छा केली व्यक्त…

गोंदिया / धनराज भगत

 आज महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहरालगत असलेल्या नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी प्रफुल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा अर्चना केली. यावेळी देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभेवर विचारलं असता प्रफुल पटेल यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली. “प्रफुल पटेल हे निवडणूक लढायला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे, पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही” असे म्हणत “उद्या संधी मिळाली तर नक्कीच लढेल असेही प्रफुल्ल पटेल म्हणायला विसरले नाही.. त्यामुळे राज्यसेवेवर गेल्यानंतर देखील प्रफुल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभेच्या मोह सुटला नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.