चपराळा यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू.

0
53

आष्टीः

चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरीता बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ मार्च ला सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

 

भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरअल्ली ता. मुलचेरा असे मृत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

 

उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. आठ मार्च ला चार वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरअल्ली येथे पाठविण्यात आले आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे

Previous articleगोंदिया- भंडारा लोकसभा प्रफुल्ल पटेल लढणार का…???
Next articleगोंदिया जिल्ह्यात माता मृत्यू दर शून्य करण्याचा संकल्प करा :- डॉ. हुबेकर