जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित भव्य महिला रॅलीच्या माध्यनातून बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील डॉक्टर्स आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व के टी एस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शून्य माता मृत्यू बाबत जनजागृती केली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नेहरू चौक येथून सुरू झालेल्या रॅली मध्ये बाई गंगाबाई च्या अधीक्षक डॉ नितीका पोयाम महिला अर्बन बँकेच्या डॉ माधुरी नासरे माजी नगरसेविका भावना कदम के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर मानसिक रोग तज्ञा डॉ सुरेखा आझाद मेश्राम डॉ मीना वट्टी,डॉ सुवर्णा उपाध्याय डॉ सुशांकी कापसे डॉ टेम्भुरकर,अडवोकॅट सपाटे ओ पी डी स्टाफ नीलम शुक्ला सार्वजनिक आरोग्य अधिपरिचरिका निलू चुटे अर्चना वासनिक रुपालीटोने आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. या वेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रॅली ला उद्बोधन करताना महिला अर्बन बँकेच्या अध्यक्ष डॉ माधुरी नासरे म्हणाल्या की”मुलीच्या जन्माचे स्वागत करा” ,”मुलींचे संगोपन चांगले करा”,” आत्मनिर्भर करा”बेटी बचाओ आणि बेटी पढाओ असा संदेश डॉ माधुरी नासरे यांनी दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज बाळंतपणात होणारे महिलांच्या मृत्यू बाबत जनजागृती करण्यासाठी प्रसूती तज्ञा व स्त्री रोग तज्ञानी संकल्प केला आहे. स्त्री चा सन्मान करा भविष्यात होणाऱ्या आई वाचवा आणि माता मृत्यू शून्य झाले पाहिजे यासाठी संकल्प करा असा संदेश डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिला. या वेळी डॉ भावना कदम यांनी सांगितले की आता महाराष्ट्र मध्ये जन्म घेतलेली बेटी जन्मतः च लखपती असणार आहे त्यामुळे भगिनींनो काळजी करू नका,मुलीच्या जन्माचे स्वागत करा.मुलगी आहे तर भविष्य उज्ज्वल आहे असा संदेश त्यांनी दिला. बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ नितीका पोयाम यांनी उपस्थित डॉक्टर्स व परोमेडीकल स्टाफ यांना शून्य माता व बाल मृत्यू बाबत या निमित्ताने शपथ दिली. बेटी बचाओ व बेटी पढाओ चे नारे देत गोंदिया शहरातून रॅली काढण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.