जागतिक महिला दिन सृजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये साजरा……..

0
29
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 09 मार्च 2024

देवळी : स्थानिक सूजन इंग्लिश मिडियम स्कूल अन्ड ज्यूनियर कॉलेज ऑफ सायन्स वतिने शाळेमध्ये 8 मार्च 2024 ला जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला. या कार्यकमाला अध्यक्षा म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. शोभाताई रामदासजी तडस होत्या तर प्रमख पाहुणे म्हणून प्रतिक्षा मेंढे, (मंडळ कृषी अधिकारी) मनिषा माजरखेडे (नायब तहसिलदार वर्धा) पल्लवी पातोडकर (संचालक, सेल अॅकेडमी वर्षा ) तसेच संस्था अध्यक्षा डॉ. श्रध्दा चोरे, संचालिका सौ. प्रिती चव्हाण, प्राचार्या सिमा वाघमारे, मुख्याध्यापिका प्रिया वैद्य यांची उपस्थिती होती. पाहुण्याचे हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यकमाची सुरूवात झाली. कार्यकमाच्या अध्यक्षा सौ. शोभा रा. तडस यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात महिलेला आदर व सन्मान दिला गेला पाहीजे तसेच शाळेतील मुली अभ्यासात व खेळात अब्बल असुन मुलीकरीता विविध उपक्रम राबवितात त्या बद्दल शाळेचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवंरानी आपल्या भाषणात महिला दिनानिमित्त महिलाचे योगदान हे पुरुषाच्या बरोबरीचे आहे. समाजात आजही काही महीला अत्याचाराला बळी पडत आहे. महिलेनी त्यासाठी धैर्यानी लढावे असे आवाहन केले.

कार्यकमाचे संचालन सौ. सरला कापसे, आभार कल्याणी वंजारी यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील मुली जीजामाता, राणी लक्ष्मीबाई, किरण बेदी, कल्पना चावला, इंदीरा गांधी, यांच्या वेशभुषेत आल्या. शिक्षकांचे व विद्यार्थीनीचे भाषणे झाली.

कार्यकमाच्या यशस्वीते करीता पल्लवी काळे, किर्ती कामडी, मनोज बकाणे, अनुप चिंचपाले, मयुर तेलरांधे, मयूर राऊत, शिवाणी कडू, अनमोल तिवसे, निलेश शेडे, काठोके सर वरघणे सर, अर्चना हुडे, पाठक मॅडम, कुबडे मॅडम, अनघा अंबरकर, जोत्सना चोरे, निलेश शेंडे, ओझा मॅडम, सावरकर मॅडम, वंदना चोरे, भोयर सर, वैतागे मॅडम, गावंडे सर, दरणे मॅडम, मांडवकर मॅडम, बकाणे मॅडम, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगिताने कार्यकमाचा समारोप करण्यात आला.