जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील पिपरीचुन्नी येथे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत परमात्मा एक सभा मंडपाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पार पाडण्यात आले. सदर सभामंडपासाठी 2515 निधि अंतर्गत 10 लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच सभामंडपाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. याप्रसंगी सरपंच विजय पटले, उपसरपंच विनोद ठाकरे, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी रोजगार सेवक नंदू पटले, ग्रामपंचायत कर्मचारी जयप्रकाश ढोमळे तसेच गावातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
Home आपला विदर्भ भंडारा पिपरीचुन्नी येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडप बांधकामाचे...