21 मार्च पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

0
56

  गोंदिया / धनराज भगत

 पोलीस अधीक्षक गोंदिया कार्यालयाचे 6 मार्च 2024 चे पत्रानुसार जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 7 मार्च पासून ते 21 मार्च 2024 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विजया बनकर यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.             
Previous articleपिपरीचुन्नी येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन
Next articleशासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक