साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्ममय पुरस्कार आणि काव्यगौरव पुरस्कारने सन्मानित

0
40

सालेकसा / बाजीराव तरोने

अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर तर्फे तिसरे अण्णाभाऊ साठे साहित्य व संस्कृती संमेलन सोमवार दि ११/४/२४ला श्री साई सभागृह,व्होकार्ड हॉस्पिटलमच्या मागे शंकर नगर चौक,अंबाझरी रोड नागपूर येथे संपन्न झाले या कार्यक्रमात सालेकसा येथील किरणताईं मोरे चव्हाण यांना काव्यगौरव पुरस्कार आणि अण्णाभाऊंच्या विचारांची पेरणी करणाऱ्या ‘सत्यशोध’ एक काव्यपुष्प या काव्यसंग्रहाच्या प्रतिकृतीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्ममय पुरस्कार देत साहित्यसंमेलनाध्यक्ष प्रा विलास सिंदगीकर,प्राचार्य माधव गादेकर,चित्रपट निर्माते गीतकार सुरेश पाटोळे, भुपेश तळेकर डॉ धनंजय भिसे,उपस्थित होते तेव्हा जेष्ठ साहित्यकार धोंडोपंत मानवतकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ साहित्यकार चंद्रकात वानखेडे ,प्रभूदास तायवाडे इतर मान्यवरांनी अभिनंदन केले पुरस्काराचे स्वरूप शाल,प्रमाणपत्र,शिल्ड,असे होते विशेष म्हणजे याच काव्यसंग्रहाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्ममय पुरस्कार हा मागच्यावर्षी पुणे येथे मातंग साहित्य परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्यातर्फे मिळालेला होता.