देवळीच्या समिक्षा हटवार यांना वुमन रायझिंग स्टार अवार्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित

0
53

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-14 मार्च 2024

देवळी येथील उत्कृष्ठ गायिका समिक्षा संजय हटवार यांना नाशिक येथे ‘नाळ’ मराठी चित्रपटाच्या नायिका अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्या हस्ते वुमन रायझिंग स्टार अवार्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दर्पणदार बाळशास्त्री जांभेकर आणि कृतिका महिला बहुउद्देशिय संस्थेच्या सहकार्याने दिनांक 10 मार्च रोजी प्लश सभागृह नाशिक येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कार्य केलेल्या कर्तुत्वान महिलां चा 2024 राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रीय पत्रकार संघाने अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला. तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती पोलिस उपायुक्त अधिकारी मोनिका राऊत यांची होती ग्राहक सरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशाताई पटेल, राष्ट्रीय बाल हक्क समिती सदस्या सायली पालखेडकर, लोकभारतीच्या प्रदेश अध्यक्ष शशीताई अहिरे , ग्रिन रिसोरसचे अध्यक्ष डाॅ. के शर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समीक्षा हटवार यांना ऐकाच वर्षात राष्ट्रीय सिने कला गौरव पुरस्कार व वुमन रायझिंग स्टार अवार्ड 2024 असे दोन मोठे पुरस्काराने सन्मानित केले. याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्ममय पुरस्कार आणि काव्यगौरव पुरस्कारने सन्मानित
Next articleचिरचाळबांध येथे पांदन रस्त्याचे भूमिपूजन…