जागतिक महिला दिना निमित्त महिला शेतकऱ्यांचा सत्कार

0
17
1

गोंदिया / धनराज भगत

दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन इनेरा क्रॉप सायन्स प्रा. लि. या कंपनीच्या मध्यामातून चांदोरी येथे महिला शेतकरी सभा आयोजीत करण्यात आली.आणि या सभेत शेतकरी बांधवाना धान पिकाचे व्यवस्थापन संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. जमिनीचा पोत कायम राखून तसेच जमिनीतील सेंद्रिय घाटकांचे महत्व व एकरी उत्पादनाची वाढ या करिता एनरा चे फायरो एम जी या बद्दल कंपनी च्या वतीने  निरज मुरतकर व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचं प्रमाणे गावातीला महिला शेतकरी
श्रीमती सहीला अविनाश बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला. सहिला बनसोड या मागील 27 वर्षा पासून शेती करत असून या महिला शेतकरी आपल्या शेतात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात, आणि खंबीर पणे शेती व्यवसाय करून नवा आदर्श निर्माण केल्या बदल कंपनीच्या वतीने यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी गावातीली मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष शेतकरी त्याचप्रमाणे गावातील सरपंच तसेच उमेद संंस्था चे पदाधीकारी उपस्थित होते.

कंपनीच्या वतीने परमानंद बागडे, गुरुदेव धोटे , निखिल आमगावकर, प्रशीत चाकोले यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.