आमगाव नगर परिषदचा विषय पेटला
राज्य सरकारने प्रलंबित ठेवलेले न्याय प्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी नागरिकांचा एल्गार
गोंदिया / धनराज भगत
आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय राज्य सरकारने मागील नऊ वर्षापासून सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित ठेवले असून अद्याप ही या प्रकरणावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित ठरलें आहे. आता हा विषय नागरिकांनी एल्गार पुकारत सरळ देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आमगांव नगर परिषद अंतर्गत 20 हजार मतदारांचे लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार करणारी गावे – आमगांव, बनगांव, रिसामा, कुंभारटोली,बिरसी,पदमपुर, माल्ही, आणि किडंगीपार