शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) वासुदेव भुसे यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे कडून सत्कार 

0
7
1

चामोर्शी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने सोमवारी ११ मार्च रोजी जि. प.माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांचा सत्कार करण्यात आला.वासुदेव भुसे हे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सांगली ,तसेच सन – १९९८ ते २००३ मध्ये संशोधन सहाय्यक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,, सन – २००३ ते २०११ अधीक्षक सामाजिक राज्य सेवा (गट ब )सिंधुदुर्ग, बारामती ,कोल्हापूर ,सन – २०११ – २०१५ अधीक्षक वेतन पथक (माध्यमिक ) सांगली ,सन – २०१५ -२०१९ मध्ये अधीक्षक उच्च माध्यमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे , सन – २०१९ – २०२४ अधीक्षक वेतन पथक उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सांगली ,व ११ मार्च २०२४ पासून शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.गडचिरोली येथे रुजू होऊन कार्यभार हाती घेतला आहे वासुदेव भुसे यांच्या अनुभवाचा नक्कीच दुर्गम अशा जिल्ह्यातील शिक्षणासाठी होणार आहे. सत्कारप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार ,जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल मुनघाटे , जिल्हाध्यक्ष अनिल नुतिलकंठावार ,जिल्हा कोषाध्यक्ष जीवन उईके ,जिल्हा संघटनमंत्री विश्वजित लोणारे व प्रशांत मुप्पिडवार,शिक्षक डी.एम.जवंजार ,प्रभारी मुख्यध्यापक एम.जे.वासनिक ,गडचिरोली तालुकाध्यक्ष पंकज भोंगेवार ,जिल्हा संघटक दिलीप तायडे ,वडसा तालुकाध्यक्ष जगदीश केळसरकर ,नरेश बुटे ,अतिश बनसोड , यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे पदाधिकारी उपस्थित होते.