धक्कादायक!कवलेवाडा डॅम वैनगंगा नदी पात्रात आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह

0
5
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

 तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या कवलेवाडा डॅम वैनगंगा नदी पात्रात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. यावेळी सदर घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे रवाना केले. सदर मृतकाचे वय 20 ते 22 वर्ष असून ही अनोळखी तरुणी कोण? कुठली? याचा शोध सिहोरा पोलीस करीत असून घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांच्या निर्देशानुसार सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजू साठवणे, पोलीस हवालदार मनोज इडपाते, पोलीस शिपाई संतोष शिंदने करीत आहेत.