जी ई एस रिटायर्ड कर्मचारी कडून महिलांच्या सन्मान

0
4
1

गोंदिया / धनराज भगत

जीईएस रिटायर्ड कर्मचारी असोसिएशन कडून गड्डाटोलीच्या सत्य साई मंदिर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस च्या निमित्ताने दिं.१३ जानेवारी रोजी सेवानिवृत महिलांचा सत्कार करण्यात करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्बन महिलांच्या अध्यक्षा माधुरी नासरे तर प्रमुख अतिथी म्हणून मंजू कटरे व भाविका बघेले ,अरोरा मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले ,माता सरस्वती आणि मनोहर भाई पटेल च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव सी.बी.बिसेन यांनी एसोसिएशन च्या वतीने वर्षभराच्या कार्यक्रमाची माहिती देऊन सत्कार मूर्ति, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विना देशपांडे, रुक्मिणी गुप्ता आणि वंदना शामकुवर यांच्या उत्कृष्ट सेवा कार्याची माहिती तसेच सेवानिवृत कर्मचारी एसोसिएशन च्या उपक्रमाची माहिती दिली.
संघटनेचे कार्याध्यक्ष हनवते आणि अध्यक्ष सुखनंदन तुरकर यांनी महिला सन्मान दिवसानिमित्त आपले विचार प्रकट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.माधुरी नासरे, प्रमुख अति थी व समाजसेविका मंजू कटरे आणि भाविका बघेले यांच्या हस्ते सत्कार मूर्तीच शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष अतिथी व समाज सेविका मंजू कटरे व भाविका बघेले यांनी आपल्या द्वारा चालवले जाणारे वेगवेगळ्या उपक्रमाची बाबद माहिती दिली. डा.माधुरी नासरे यांची महिला अर्बन बेकेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवडच्या निमित्ताने संघटने चे अध्यक्ष तुरकर व सचिव जायसवाल यांनी पुष्पगुच्छ व मोमेंटो देवून सत्कार केला. गोंदिया शिक्षण संस्थेमधून आपन सर्व सेवानिवृत्त झालो असलो तरी, आपलेपण कायम आहे ही आनंदाची बाब आहे माझे सहयोग नेहमी संघटनेला मिळेल असे माधुरी नासरे मॅडम म्हणाल्या. याप्रसंगी सत्कार मूर्ती देशपांडे मेडम,गुप्ता मेडम,शामकुवर मेडम यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमात चंदनकर सर डी.बी.तुरकर सर एम.जे. पटले, एन.के.रहांगडाले,आर आर लिल्हारे प्रा. संजय टप्पे ,संतोष श शामकुवर, भगीरथ जीवानी, विजय मडामे, शिवदास कापगते, बी.ए .राऊत आणि इतर सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुशीला पोरचट्टीवार यांनी केले आभार एफ.सी. पटले यांनी मांनले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संरक्षक एच.बी.जायसवाल कोषाध्यक्ष केशव चित्रिव, देवी पांडे ,नान्हे बाबू आर आर. लिल्हारे यांनी अथक सहयोग केला या निमित्ताने भोजन व्यवस्था वंदना संतोष यांच्याकडून करण्यात आली.