न्युज प्रभात वृत्तसंस्था
अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली होती अखेर आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 सात टप्प्यात होणार असून मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली आहे.
19 एप्रिल ला 102 सीटवर पहिला टप्प्यातील मतदान होणार आहे. 26 एप्रिल ला 89 सीट वर दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून 7 मई ला -94 सीट वर ,13 मई ला 96 सीट वर ,20 मई ला 49सीट वर ,25 मई ला 57 सीट वर आणि 1 जून ला 57 सीट वर टप्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्यात 19 एप्रिल पासून महाराष्ट्रात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे.
पहिल्या (19 एप्रिल ला )टप्प्यात पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक या लोकसभा क्षेत्रात निवडणूक होणार आहे.
चार जूनला मतगणना होणार असून चार जूनला देशात कोणाची सत्ता येणार आहे हे मात्र स्पष्ट होणार आहे.