मा. श्री. ए.टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांचे न्यायनिर्णय
गोंदिया / धनराज भगत
आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांनी विनयभंग प्रकरणातील आरोपी नितीन देवराज पुरी मुलतानी वय २५ वर्षे, रा. किन्ही, ता. व जि. गोंदिया यांस २ वर्षांचा सश्रम कारावास व २०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, आज दिनांक २१/१०/२०१७ रोजी सकाळी ९.०० वाजताच्या दरम्यान फिर्यादी/पिडिता ही गावाच्या बाहेर झुडपी जंगलात शौचास गेली असता व ती शौचास बसली बसता आरोपी नितीन देवराज पुरी मुलतानी वय २५ वर्षे, हा फिर्यादीच्या मागे मागे सायकलने जावून तीला शारिरिक सुखाची मागणी केली असे लज्जास्पद बोलले असता फिर्यादीने नकार देवून आरोपीस सदर बाब घरच्या लोकांना सांगण्याची धमकी दिली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर बाब पिडितेने तिच्या घरच्या लोकांना सांगितले व आरोपीविरोधात दिनांक २१/१०/२०१७ रोजी पो.स्टे रावणवाडी येथे आरोपी विरूध्द तकार दाखल केली होती. सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन तपासी अधिकारी रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांनी घटनेचा सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द दोषारोप पत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार/पिडित पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्री वसंतकुमार चुटे यांनी एकुण ५ साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली व आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून पिडितेतर्फे युक्तीवाद केला.
एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादा नंतर मा. न्यायालय ए. टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी नामे नितिन मुलतानी, वय २५ वर्षे, रा. किन्ही, ता. व जि. गोंदिया यांसः-
१) कलम ३५४(अ) भारतीय दंड विधाना प्रमाणे २ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये २०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा तसेच
२) कलम ३५४ (क) भारतीय दंड विधाना प्रमाणे २ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये २०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा अशी २ वर्षाचा सश्रम कारावास व एकुण प्रत्येकी २,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरणात मा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे गोंदिया यांचे मार्गदर्शनात व पुरूषोत्तम अहिरकर, पोलीस निरिक्षक रावणवाडी यांचे देखरेखीत पोलीस कोर्ट पैरवी कर्मचारी पो.शि. यादोराव कुर्वे, पो. स्टे रावणवाडी यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.

