20 मार्च पर्यंत शिक्षक दिले नाही तर 21 मार्चला शाळेला कुलूप ठोकणार

0
62

जिल्हाधिकारी सह सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन सादर

हिंदी पूर्व माध्यमिक शाळा हल्बीटोला (पिपरिया) येथील प्रकरण

सालेकसा / बाजीराव तरोने

कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची बदली करण्यापूर्वी तेथील व्यवस्था पूर्ववत कशी करता येईल याची दक्षता घेण्यात येते मात्र असं काहीही न करता येथील शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करून देण्यात आल्यानंतर येथे दोन नवीन शिक्षक पाठविण्यात आले. त्यांना येथील व्यवस्था समजून घेण्यास वेळ लागेल अन् तोंडावर वार्षिक परीक्षेचे तान येऊन पडले आहे. असा परिस्थितीत येथील पालकांसमोर आपल्या पाल्यांच्या भविष्याची मोठी चिंता पडलेली आहे.
प्रकरण आहे अति दुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित क्षेत्रातील अवघड म्हणून ओळख असणाऱ्या हिंदी पूर्व माध्यमिक शाळा हल्बीटोला (पिपरिया) चा. येथे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करीता सर्वच प्रयत्न यशस्वीरित्या सुरू होते की दिनांक 13 मार्चला येथील सर्व शिक्षकांची बदली करून देण्यात आली व दुसऱ्या दिवशी येथे दोन नवीन शिक्षक पाठविण्यात आले. येथील दृश्य बघून पालकांमध्ये एकच नाराजी पाहण्यात आली.
दिनांक 15 मार्चला एका निवेदना द्वारे 20 मार्च पर्यंत येथे उर्वरित रिकामी सर्व शिक्षकांची जागा भरण्यात यावी अन्यथा 21 मार्चला शाळेला कुलूप ठोकू या दरम्यान काही कमी जास्त झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असी नोंद ही निवेदनात करण्यात आली. निवेदन गोंदिया चे जिल्हाधिकारी,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,मा. शिक्षण अधिकारी (प्राथ.),सालेकसा तहसीलदार,मा. गटविकास अधिकारी,मा. गट शिक्षणाधिकारी व मा. पोलीस निरीक्षक सालेकसा यांना देण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणराज कोरोटे,उपाध्यक्ष दुलीचंद दशरिया,सदस्य तथा उप-सरपंच गुणाराम मेहर,सदस्य राजेंद्र राऊत,अभिभावक खुशाल रतोने,लखन दमाहे,मदनलाल सुलाखे,रुकेश दमाहे तथा परदेसी मानकर आदि उपस्थित होते. सदरची माहिती येथील सर्वच जनप्रतिनिधींना देण्यात आली असून हेच हल्बीटोला (पिपरिया) गाव माझे आहे असे सांगणारे आमदार सहेषराम कोरोटे यांना सुद्धा यांची जाणीव असून आता येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोण कितपत सहकार्य करते किंवा 21 मार्चला नाईलाजास्तव शाळेला कुलूप ठोकण्यास येथील व्यवस्थापन समिती व पालकांना मजबूर व्हावा लागेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.