गोंदियाच्या सालेकसा येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला 4 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले…. शेळीपालनाचा धनादेश मिळवण्यासाठी केली होती 5 हजार रुपये लाचेची मागणी
पंचायत समिती सालेकसा येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने 4 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. सरोजकुमार बावनकर (५६) रा. गोंदिया असे लाच घेणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांची शेळीगट अनुदान मध्ये निवड झाली होती. दरम्यान पहिल्या टप्प्याची रक्कम तक्रारदाराला मिळाली होती. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान धनादेश काढून देण्याकरिता आरोपीने 5 हजार रुपयाची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळविले असता तडजोडीअंती 4 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी पशुधन विकास अधिकाऱ्यावर रात्री उशिरा सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.