सदस्यांना विश्वासात न घेणे भावेले : दोन विरुद्ध सात मतांनी ठराव
गोंदिया / धनराज भगत
आमगांव तालुकाअन्तर्गत ग्रामपंचायत महारीटोला येथील सदस्यांनी सरपंच रिता संतोष मेंढे यांच्यावर दि.१८ मार्च रोजी अविश्वास ठराव पारित केले. ग्रामपंचायत येथील कामानिमित्त सदस्यांना विश्वासात घेऊन सरपंच कामे करीत नव्हते आणि इतर करणावरून ठपका ठेवत सात ग्रामपंचायत सदस्य दि.११ मार्च रोजी देवदर्शनाला निघून गेले होते. दि.१८ मार्च रोजी सकाळी १० वाजे ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्वास ठराव ठेवला या वेळी निवडणूक अधिकारी रवींद्र होळी, नायब तहसीलदार गुणवंत भुजाळे, पोलीस निरीक्षक युवराज हांडे,तलाठी सहारे,उपस्थित होते. या वेळेस गावातील सरपंच रिता मेंढे यांच्या समर्थकांनी सरपंच यांना आपली बाजू मांडण्याची मुभा देण्यात यावी या मागणीला घेऊन महिलांनी ठिय्या आंदोलन केले. अविश्वास २ विरुद्ध ७ सदस्य असा अविश्वास पारित करण्यात आले.