‘अखेर सोसल्या मृत्यूयातना’ पुस्तकाचे विमोचन

0
4
1

दुर्धर आजाराशी लढण्याचे सामर्थ्य पुस्तकात – डॉ साजिद खान

गोंदिया / धनराज भगत

 गोंदिया जिल्हा अंतर्गत आमगाव तालुक्यातील किकरीपार साझा येथे तलाठी असलेले वाशिम जिल्ह्यातील प्रविण चव्हाण लिखित ‘अखेर सोसल्या मृत्यूयातना’ या पुस्तकाचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा साई लॉन आमगाव येथे पार पडला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लेखक प्रविण चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक युवराज हांडे, दीपप्रज्वलक म्हणून शिक्षणाधिकारी ( माध्य. ) विशाल डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ साजिद खान, नायब तहसीलदार गुणवंत भुजाडे, माजी केंद्रप्रमुख हेमंत पटले, पत्रकार राजीव फुंडे, किसन तिवारी उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करतांना डॉ साजिद खान म्हणाले की, जीवन जगतांना खूप संकटे येतात. आलेल्या संकटांना न घाबरता तोंड दिले पाहिजे. माणसाला एखादा आजार झाला की तो लगेच घाबरतो. आणि दुर्धर, जीवघेणा आजार झाला तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अशा जीवघेण्या आजारांशी लढण्याचे सामर्थ्य ‘अखेर सोसल्या मृत्युयातना’ या पुस्तकामुळे निश्चितच आत्मविश्वास रुग्णामध्ये निर्माण होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ उमाकांत पटले, प्रविण चव्हाण, मुरलीधर चव्हाण, मधुकर राठोड, सुरज राठोड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैपाल ठाकूर यांनी तर आभार डॉ उमाकांत पटले यांनी व्यक्त केले.