लोकसभा निवडणूक पर्वावधित सणासुदीच्या दिवसात आचारसंहिता भंग होणार नाही, याची खबरदारी घेऊन शांततेत पार पाळा – उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे आवाहन…
पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस पाटील व शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन
गोंदिया / धनराज भगत
आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन होळी धुलीवंदन,गुडीपाडवा, रमजान ईद,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान व गुड फ्रायडे हे सण शांततेत पार पाळा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी केले. ते पोलीस स्टेशन आमगावच्या सभागृहात शांतता समितीचे सदस्य पोलीस पाटील व दक्षता समितीचे सदस्याच्या शांतता बैठकीत बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रवींद्र होळी, पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे पदाधिकारी होते. यावेळी तहसीलदार रवींद्र होळी यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा उल्लंघन होऊ नये व निवडणूक शांततेत पार पाळावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन गोपनीय शाखेचे सुरेंद्र लांजेवार यांनी केले तर आभार महिला पोलीस सत्यशीला छिपे यांनी मांडले. या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, दक्षता समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.