गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येत आहे. असे असले तरी जिल्ह्यात तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नवे तांदूळ बाजारात आले असून सुगंधित तांदूळ 70 रुपये, जय श्रीराम तांदूळ 60 रुपये, एचएमटी 50, आणि अन्य वानाचे तांदूळ 50 रुपये दराने विकले जात आहेत.
अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे धानाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने तांदळाची दरवाढ होत आहे.