राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत संजय कोंकमुट्टिवार यांच्या नवोपक्रमाची निवड

0
53

अहेरी /प्रतिनिधी 

शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याऱ्या सर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी येथील उपक्रमशील शिक्षक संजय कोंकमुट्टिवार यांनी सादर केलेल्या “नाविन्यातुन गणित …..चार अंकाची किमया न्यारी” या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली असून लवकरच खास कार्यक्रमात त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख उमेश चिलवेरवार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे व केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. संजय कोंकमुट्टिवार यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या विद्यार्थ्यांना दिले आहे.