बनगाव येथील अनिहा नगरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचा तीव्र विरोध

0
84

# नागरिक वसाहतीत टॉवरला मंजूरी
# प्रशासनाचे दुर्लक्ष
# नागरीक तीव्र आंदोलन करणार

गोंदिया / धनराज भगत

आमगाव नगर परिषद परीषद अंतर्गत बनगाव येथील अनीहा नगर वसाहतीत नगर परिषद कर्मचारी यांच्या संगनमताने अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारणीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे नागरीकांनी तीव्र विरोध प्रदर्शन करीत टॉवर उभारणीला विरोध करीत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
बनगाव येथील अनिहा नगर परिसरात सरस्वती विद्यालय प्रवेशद्वार व घनदाट लोकवस्तीत प्रशासनाने योग्य जवाबदारी न घेता या ठिकाणी संगनमताने मोबाईल टॉवर उभारणीला परवानगी दिली आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र विरोध निर्माण झाले आहे.
राज किराणा दुकानचे संचालक राज भोयर या व्यक्तीने अनधिकृतपणे इमारतीवर मोबाईल टॉवर उभारणीला दि. ५ जानेवारी २०२४ ला सुरवात केली होती.यात नागरिकांनी आक्षेप नोंद करून नगर परिषदला लेखी तक्रार केली होती. यावर नगर परिषद ने टॉवर उभारणी बांधकामाला थांबविण्याचे आदेश देत राज भोयारला नोटिस बजावली होती. परंतु राज भोयर ने दिनांक २० मार्चला पुन्हा सदर इमारतीवर टॉवर उभारणी बांधकामाला सुरुवात केली .यामुळे नागरिकांमध्ये तीव्र विरोध निर्माण झाले. नागरिकांनी पोलीस निरीक्षक व नगर परिषद मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार केली परंतु प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही. यामुळे नागरिकांनी टॉवर उभारणीला विरोध प्रदर्शन करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 लोकवस्तीत प्रशासनाने परवानगी का दिली…!

नागरीक नगर परिषद प्रशासन ने लोक  लोक – आक्षेप असताना व मोबाइल टॉवर मुळे होणारे मानवीय जीवनावरील दुष्परिणाम लक्षात असताना तसेच शाळा महाविद्यालय परिसरात टॉवर उभारणीला मंजूरी देताना  आक्षेप लक्षात का घेण्यात आले नाही ? असा सवाल नागरीकांना केला आहे. लेखी आक्षेप असताना त्याची जन सुनावणी घेण्यात आले नाही,तर टॉवर परिसरातून पाणी वाहणारे कालवा ही प्रदूषित होत असून कालवा ला लागून टॉवर उभारणीला मंजूरी म्हणजे संगनमत दिसून येते आहे. यात न्यायालयीन लढाई नागरिक लढणार असे मत नागरिकांनी दिले आहे.

Previous article‘त्या’ आरोपीस आजन्म सश्रम तुरुंगवास…
Next articleजिल्हा परिषद पिंडकेपार क्षेत्रातील बूथ कमेटी मेळावा व जनसंवाद कार्यक्रम संपन्न