बोगस डॉक्टर वर कारवाई – पोलीस ठाणे गोरेगाव येथे गुन्हा नोंद

0
80

गोंदिया / धनराज भगत

पोलीस अधीक्षक, गोंदिया, निखिल पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.  अमरीश मोहबे, गोंदिया यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक गोरेगाव, यांचे तक्रारीवरुन गोरेगाव पोलीसांनी गोरेगाव येथील बोगस डॉक्टर- नितेश बाजपेयी, यांचे विरुद्ध कारवाई करत केला गुन्हा दाखल…

 दि . 21 मार्च 2024 गुरुवार रोजी मा. जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांना माहिती मिळाली की , गोरेगाव येथे एक बोगस डॉक्टर त्याचेकडे कुठलेही शासन मान्यता प्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) हॉस्पिटल चालवत आहे,अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाले वरून जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी सदर ची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांना देवुन कारवाई करण्याकरिता मदत करण्याची विनंती केली होती.
पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी जिल्हा शल्य चिकित्सक  गोंदिया यांचे टीम ला कारवाई करण्याकरिता मदत करण्याचे तसेच बोगस डॉक्टर संबंधात खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे गोरेगाव यांना दिले होते.
त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक सा, गोंदिया यांचे चमू सोबत गोरेगाव पोलीस पथकास रवाना करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक गोरेगाव, यांचे सह पोलीस पथक गोरेगाव येथील डॉक्टर- नितेश बाजपेयी यांचे हॉस्पिटल येथे पोहचून त्यांना आपली ओळख देवुन त्यांच्या दवाखाना रजिस्ट्रेशन परवाना बाबत विचारले असता, सदर ठिकाणी असलेल्या नर्स स्टाफ कडून कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन परवाना नसल्याबाबत सांगून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.
सदर हॉस्पिटल मध्ये एक महिला ऍडमिट असून तिच्यावर विना पात्रता धारक डॉक्टर द्वारे ( बोगस डॉक्टर द्वारे) औषधोपचार सुरू होते. तसेच तसेच हॉस्पिटल  बाबत कोणतेही प्रकारचे रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक,गोरेगाव डॉक्टर  विजय पटले यांनी दोन शासकीय पंचा समक्ष सदर ठिकाणी रीतसर कायदेशीर कारवाई केली.सदरचे हॉस्पिटल व त्यातील डॉक्टर हे बोगस असल्याने वैद्यकीय अधीक्षक, गोरेगाव  पटले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे अप क्र- 130/2024 Maharashtra Medical Practitioners Act, 1961, 33(2) B कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भुसारी, यांच्या मार्गदर्शनात पोउपनि- सुजित घोलप, हे करीत आहेत.
Previous articleबाबासाहेबांच्या जयंतीला घरांवर निळे झेंडे व पंचशील झेंडे लावून रोषणाई करा…
Next articleभामरागड वनातील वनौषधीचे संवर्धन करणे काळाची गरज…