भामरागड वनातील वनौषधीचे संवर्धन करणे काळाची गरज…

0
12
1

भामरागड वनातील वनौषधीचे संवर्धन करणे काळाची गरज…

डॉ. कैलास व्हि. निखाडे , निर्सग अभ्यासक

भामरागड :- गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14442 चौरस किलोमीटर आहे गडचिरोली जिल्हा 76 % जंगलाने व्यापलेला आहे हा जिल्हा साग बांबू तेंदूची पाणी करिता प्रसिद्ध आहे. तसेच आलापल्ली क्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जंगलातील विविध प्रकारच्या झाडांचा त्यांच्या नैसर्गिक स्थितीनुसार अभ्यास करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या प्लॉटचे क्षेत्रफळ जवळपास 6 हेक्टर क्षेत्र आहे. त्यांची स्थापना 1953 मध्ये झाली आहे भामरागड अभयारण्याची राखी वनक्षेत्र 104.38 चौरस किलोमीटर आहे. भामरागड अभयारण्य हे दक्षिणी उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी जंगल आहे. साग हा हा येथे सर्वसामान्यपणे आढळून येतो 245 प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये अर्जुन बेडा, बिजा, बेल, सीसम, तेंदू, हिरडा, कुसुम, जांभूळ, आंबा, हळदू कदब इत्यादी प्रमुख वृक्ष जाती अभया अभयारण्यात आढळतात. हजारो वर्षापासून औषधी वनस्पती या रोग परिहार वेदना मुक्ती सौंदर्यवर्धन इत्यादीसाठी जगभर वापरल्या जाते वनस्पतीचे मूळ खोड पान फुले बिया चाल इत्यादी पासून बनवलेले अर्क लेप तेल इत्यादी स्वरूपात उआणले जातात.
आयुर्वेद युनानी निसर्गोपचार होमिओपॅथी ऍलोपॅथी चिनी तिबेटिन इत्यादी सर्व औषधी पद्धतीमध्ये औषधी वनस्पतीचा वापर होतो. भारतात औषधी वनस्पतीच्या सुमारे 2000 जाती आढळतात भामरागड मध्ये एकूण 128 गावे येतात.तसेच आदिवासी भागामध्ये वनौषधी या जास्त प्रमाणात उपयोग करतात भामरागड हा अति दुर्गम भाग असल्यामुळे या भागात आरोग्याची सुविधा फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे या भागातील आदिवासी लोक वैदू कडून औषधी घेतात त्यांचा दवाखान्यावर विश्वास नसून वैधूने दिलेली जडीबुटी वर जास्त प्रमाणात विश्वास आहे. आदिवासी बांधव त्यांचे पारंपारिक अन्न म्हणून आजही जंगलातील वनस्पतीचा वापर करतात आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत वनाचे स्वरक्षण संवर्धन करणे गरजेचे आहे. देशाच्या एकूण भूभागाच्या एक तृतीयांश भाग वने व वृक्ष लागवडीखाली असावे असे भारत सरकारचे धोरण आहे. वनामुळे जैव विविधतेचे संरक्षण औषधी तसेच इतर उपयुक्त वस्तूची उपलब्धता तसेच तेथील लोकांउपजीविकेचे साधन असे अनेक फायदे त्यांना होतात.
संवर्धन म्हणजे काय ?
1980 च्या दशकाच्या सुरुवातीस ब्रिटिश प्रशिक्षित नियोजन रँडल यांनी संवर्धन विकासाची रचना केली 1960 च्या दशकातील अनेक संकल्पना त्यांनी एकत्र आणल्या तसेच पर्यावरण संवर्धन प्राणी संवर्धन सागरी संवर्धन आणि मानव संवर्धन हे चार प्रकारचे संवर्धन आहेत. लुप्त होत चाललेल्या वनस्पतीचे जतन करून आपले स्वतःचे आरोग्य वाचवले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
निसर्ग संवर्धन म्हणजे काय?
नैसर्गिक वातावरण आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्या पर्यावरणीय समुदायाचे स्वरक्षण जतन व्यवस्थापन करणे सध्याच्या सार्वजनिक फायद्यासाठी आणि शाश्वत सामाजिक आणि आर्थिक उपयोगासाठी नैसर्गिक संसाधनाच्या मानवी वापराचे व्यवस्थापन समाविष्ट करण्यासाठी होते. दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवशी जनजागृती करतात. तसेच जागतिक निसर्ग सुरक्षा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणापासून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राणी व झाडाचे संवर्धन करणे आहे. आज भामरागड जंगलामध्ये वनस्पती बरोबर प्राण्याचा पक्ष्यांचा जाती नामशेष होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.
भामरागड वनातील वनौषधी वनस्पती व उपयोग
भामरागड वनामध्ये वनौषधी भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे जवळपास 100 वन औषधीची ओळख झाली आहेत परंतु अनेक झाडांची ओळख झालेली नाही. भामरागड मध्ये सर्वात जास्त ताडांची झाडे आहे लाहेरी आणि बिनागुंडा इथे काळाची ताडीची व गोरगा वनस्पती जास्त प्रमाणात दिसून येते.
1. ताडी – पचनशक्ती वाढवते फायबरचे जास्त प्रमाण आहे याशिवाय पोटाच्या समस्या अपचन गॅस दूर करते.
2. गोरगा – किडनी स्टोनचे खडे बाहेर काढतात.
3. जीजीफस रुगोसा – याला पांढरे बोर असे म्हणतात लाहेरी गावाच्या पहाडीवर ही वनस्पती दिसून येते पानाच्या सालीचा दात दुखी यावर उपयोग होतो.
4. अर्जुन साल – हृदयासाठी टॉनिक समजले जाते अर्जुनाची साल पित्त आणि कफ कमी करते त्यांचा आयुर्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
5. बेहडा- वनस्पतीची झाडे फार मोठ्या प्रमाणात आहे बेड्याच्या बियापासून तेल काढण्यात येते बेड्याच्या बियापासून तयार केलेले तेल उत्तम केशवर्धक असून केस गळण्याच्या व विरळ होण्याच्या समस्येवर हे तेल उत्तम आहे. सांधेदुखीवर उपयोगी ठरते खोकला बहुगुणी आहे.
7.हिरडा – पोटाच्या समस्येसाठी मधुमेहासाठी मेंदूची शक्ती वाढवते वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो जखम बरी करते आणि दृष्टीसाठी सुद्धा याचा उपयोग चांगल्या प्रमाणेच होतो.
7. सागरगोटी- पोटात कृमी झाल्यास लहान मुलांना देतात काटेरी झुडुप असतात.
8. वैजयंती – श्रीकृष्णाला हार अर्पण करते. हाता पायाला लावतात
9. टेंभुर्णी – ब्लड शुगर कमी करण्यासाठी या फळाचा उपयोग करण्यात येतो.
10. कुसुम- बियाणी फुले औषधी म्हणून वापरले जाते कुसुम फुलांचा उपयोग सौंदर्यप्रसाधनासाठी होतो.
11. लहान आवळा- भामरागड जंगलामध्ये लहान आकाराचा आवळा फार मोठ्या प्रमाणात मिळतो. आवळा बहुगुणी वनस्पती आहे त्यामध्ये प्रोटीन सुद्धा दिसून येते.
12. पल्लीचे सीताफळ – पल्ली हा गाव भामरागड पासून पाच किलोमीटरवर आहे. या ठिकाणी सीताफळ फार मोठ्या प्रमाणात मिळते ते सिताफळ खाण्यास फार गोड आहे. या भागात सीताफळाचे बन आहेत. औषधीयुक्त वनस्पती आहे. पाल्यापासून औषधी बनवते.
13. बांबूची कोम वास्ते – आदिवासी भागात वास्ते फार मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात बांबूचे मूळ पाणी बिया कोवळ्या खोडाचे कॉम औषधात वापरतात. आणि दरम्यान त्याचा वापर केला जातो.
14. शेवगा – या झाडाची पाने ,फुल, फळे, साल, आणि मुळे आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरतात हाडे मजबूत, पाचक शेवगा जंतनाशक असल्यामुळे पोटातील कृमी बाहेर पडतात.
15 बेल – बेलाच्या पानात आढळणारे अँटिऑक्साइड हे हृदय रोगाचा धोका कमी करण्यास मदत होते. बेलाच्या पानाचा पिल्यामुळे अनेक आजार बरे होता.
16. कुडा – दात दुखत असल्यास पांढरा कुडा झुळूक किंवा झाड असते मुळव्याधी वर त्याचा वापर होतो
17. जांभूळ – भामरागड मध्ये जांभळाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत मधुमेह व रक्त शुद्ध करणे त्यांचा पावडर केला जातो.
18. पळस – आयुर्वेदिक पळसाच्या फुलाची औषधे मधून उपयोगात करतात.
19. बिबा – दुखणे कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग करीत असतात.
20. मटारू – ही एक वेली आहे. शरीरावर आलेल्या गाठीवर देखील त्याचा उपयोग होतो. घसा खवखवणे सुद्धा बरा होतो.
21.मोह– खाण्यासाठी आदिवासी लोक यांचा तेलाचा वापर करतात साबण करणे. मोहाचे फुले गरोदर बाईला देतात मोहाने खोकला होत नाही.
22. उंबर – या झाडाची पाने वाटून विंचु चावल्यावर लावल्यास वेदना कमी होते उन्हाळी गोवर यावर उपयोगी पडते.
23. गुंज – हिचा वेल असतो पाने गोडसर असतात दोन जाती असतात पांढरी लाल त्याने खोकला बसतो मानसिक स्वास्थ राहण्यासाठी माड गळ्यात घालतात.
24.डिकमल्ली – लहान वृक्ष आहेत डिकमल्ली या झाडांचा डिंक फार फायद्याचा असतो जंताचा त्रास होत असेल तर त्याचा उपयोग केला जातो.
25. कुसुम – काटेरी फुले व जुभेदार पानाचे एक लहान झाड सारखी नारंगी पिवळी फुले असतात. बियापासून तेल काढले जातात.
26. कदब वृक्ष – मोठे झाड आहे झाडाची साल पाने आणि इतर भागापासून तयार केलेला अर्क साखरेचे प्रमाण कमी करते. कर्करोगावर सुद्धा फायदा होतो. फळ लिंबासारखे दिसतात.
27. आघाडा– हे झुळूक एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते दात घासण्यासाठी झाडाच्या काड्या वापरतात दात दुखी कप पोट दुखी खोकला यासाठी आघाडीची पाने चावून खातात.
28. कंबरमोडी – हे सुद्धा जुडूप आहे त्यांचा पाला दुखत असेल त्या ठिकाणी लेप लावतात.
29. खैर- काटेरी वृक्ष आहे खैराचा बिया प्रथिनाचे उत्तम स्त्रोत आहे. डायरिया व त्याचा उपयोग केला जातो.
30. धावळा – ही आयुर्वेदिक वनस्पती आहे धावडा पोटासाठी वापरतात.
31. रिठा– केसाला लावतात व फेस येतात.
आदिवासी भागामध्ये रानभाज्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामध्ये उतरण काटवल पांढरा कुडा बांबू वास्ते मशरूम टेकोडे या रानभाज्या सुद्धा औषधी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात.
औषधी वनस्पती लुप्त रास होण्याची कारणे
1 . पृथ्वीवर प्रत्येक दोन वर्षांमध्ये एक उपयुक्त अशी औषधीय वनस्पती लुप्त होत चाललेली आहे ही प्रक्रिया नैसर्गिक रित्या लुप्त होण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेत 100 पटीने अधिक आहे.
2. भारतातील 900 मुख्य औषधी वनस्पती पैकी दहा टक्के वनस्पती लुप्त होण्याच्या धोका सर्वाधिक आहे.
3. जे.ए.सी.एस राव यांच्या मते इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर या जागतिक संघटनेच्या मते सुमारे 20 ते 25 वनस्पतीचे अस्तित्व अधिक धोक्यात आले आहे.
4. शहरीकरण जंगली वनसंपदा नष्ट होणे औषधी वनस्पतीची लागवड न करणे.
5. औषधीच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे उपलब्धता नाही आणि योग्य ती कारवाई होत नाही. तसेच त्यामध्ये मानवी कारणे जंगलतोड शेतजमीन अग्नी इत्यादी दिसून येते नैसर्गिक कारणांमध्ये एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या हजार वर्षे लागतात पण आज फार मोठ्या प्रमाणात वनस्पती लुप्त होताना दिसून येते भामरागड मध्ये अनेक वनस्पती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामध्ये कंबरमोडी धावडा भुलनवेल रिठा आघाडा पळस काटोलाचा वेल इत्यादी वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
औषधी वनस्पती संवर्धन करण्यासाठी उपाय योजना
1. इ एक्स सी टू संवर्धन म्हणजे धोक्यात आलेल्या प्रजातीची लागवड करणे आणि त्यांचे नैसर्गिकरण करणे. हे त्यांचे निरंतर अस्तित्व सुनिश्चित करणे आणि काही वेळा औषधाच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात लागवड साम्रग्रीचे उत्पादन करणे.आणि औषधी वनस्पतीचे संसाधने टिकवून ठेवण्यासाठी तात्काळ कारवाई करणे सीड बँक तयार करणे इत्यादी.
2. इन सी टू निसर्ग राखीव जंगले औषधी वनस्पतीचे सर्वेक्षण करणे. शोध घेणे इत्यादी औषधी वनस्पतीची लागवड करणे .
3. औषधी वनस्पतीच्या बगीचा तयार करणे.
4. योग्य ठिकाणी लागवड करून सीड बँक तयार करणे.
5. आदिवासी भागात सीड बँक तयार करणे औषधी वनस्पतीचे प्रचार करणे आणि जागरूकता करणे गावातील लोकांना वनस्पतीचे बदल माहिती देणे औषधी वनस्पतीचा शेतकऱ्यासाठी कमाईचा स्त्रोत म्हणून वापर केला जाऊ शकतो या वस्तू स्थितीमुळे जैवविविधता संवर्धन संस्थाने आय बी सी औषधी वनस्पतीचे संवर्धन आणि शाश्वत वापर सीएसएमपीपी या प्रकल्पाचा विकास सुरू केला आहे.
6. वन औषधी वापराचा प्रोत्साहन देणे आदिवासी भागामध्ये वनौषधीची साक्षरता मोहीम राबवणे आदिवासी भागांमध्ये वनौषधीचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेणे.
7. आदिवासी भागांमध्ये जंगल संपत्ती ही तुमची संपत्ती असे बोधवाक्य निर्माण करणे वनऔषधीची वर प्रोजेक्ट तयार करणे.
8. समूहाचे गट तयार करणे औषधी वनस्पतीचे संवर्धन होण्यासाठी केवळ त्याविषयी जागरूकता करून चालणार नाही तर त्यासाठी नियोजन पद्धती पद्धतीने आणि ध्येयान प्रेरित होणे अशी योजना आखावी लागणार आहे. जो कोणी औषधीचे लागवड करेल त्यांची माहिती आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय डिजिटल पोर्टल वर माहिती देणे आवश्यक आहे त्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे.
दिनांक 26 फेब्रुवारी 2010 च्या शासन निर्णयानुसार औषधी वनस्पती शाखेची उद्दिष्टे खालील प्रमाणे
1. वनौषधी सुगंधी आणि खाद्य वनस्पतीचे सर्वेक्षण करून त्यांचं त्यात जागेवर संवर्धन करणे आणि डेटाबेस स्थापित करणे.
2. वनस्पतीची कंत्राटी पद्धतीने लागवड करून त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीची सोय करून देणे.
3. राज्यातील जनतेला नैसर्गिक रित्या उपलब्ध खाद्य उत्पादन आणि इतर उपयुक्त आयुर्वेदिक औषधी वनपोज परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे.
4. राज्यातील पळीत जमिनीवर पिकाच्या सेंद्रिय लागवडीसाठी वृक्षारोपण मॉडेल प्रमाणीकरण करणे.
5. राज्य देशात आणि प्रदेशात शुद्ध उत्पादनाच्या वितरणाद्वारे भारतीय आयुर्वेदिक औषधाचा प्रणालीचा प्रोत्साहन देणे.
6. वनक्षेत्राची उत्पादकता वाढवणे इत्यादी उद्दिष्टे शासनाने सांगितलेली आहे.
औषधी वनस्पती संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी
भामरागड हा अतिशय घनदाट जंगलाने व्यापला आहे जंगलामध्ये वनस्पतीचा शोध घेत असल्यास फार दूर जावे लागते.
जंगलामध्ये रस्ते नाही या सर्व वनस्पती पहाडावर आहे.
वनस्पतीला स्थानिक नाव वेगळे असते आणि पुस्तकांमध्ये त्यांचे नाव वेगळे असते.
वनस्पतीची ओळख करणे फार कठीण असते.
जंगलामध्ये फोन लागत नाही.
या भागात नक्षलग्रस्त असल्याने जंगलामध्ये फार फिरता येत नाही.
गावातील लोक जंगलात फिरत असताना आपल्याला जादूखोर समजतात.
जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला गुप्तधन शोधायला आले आहे असे समजतात वनस्पतीची माहिती लवकर देत नाही यांना आपली भीती वाटते. आपल्याला पोलीस समजतात.
भागात भाषाचा फार मोठी अडथळा निर्माण होतो. त्यांना मराठी येत नाही वनस्पतीची औषधी माहिती असते पण झाडाचे नाव माहित नसते.
वनस्पती ओळखणाऱ्या तज्ञाची फार कमतरता आहे.
आज मानव जातीने नैसर्गिक संसाधने जपून वापरायला हवीत आज आपण ही संसाधने जपून वापरली नाहीत किंवा त्यांचे योग्यरित्या संवर्धन केले नाही तर आपल्याला पुढच्या पिढीला यांचा वापर करता येणार नाही. आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वनौषधी वनस्पती उपलब्ध आहे. पण आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाणी होणार आहे. आज सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पामुळे अनेक वनस्पती नष्ट होत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून भामरागड मध्ये सुद्धा खाणी होण्याचे सर्वेक्षण झालेली आहेत. त्यामुळे भामरागड मधील वनौषधी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आज भामरागड वनातील वनौषधीचे संवर्धन करणे काळाची गरज बनलेली दिसून येत आहे.