महासंघ कार्यकारीणीत विविध स्तरावरील नविन नियुक्तीसह आमदार विजय रहांगडाले यांचे अभिनंदन ठराव मंजूर
⭐महाराष्ट्र प्रदेश युवक कार्यकारीणी अध्यक्ष पदी ओम कटरे. ⭐महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारीणी कोषाध्यक्ष पदी वाय.टी.कटरे ⭐गोंदिया जिल्हा मुख्य कार्यकारीणी उपाध्यक्ष पदी संजय कटरे यांची नियुक्ती
तिरोडा(21 मार्च) समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक उत्थाना साठी संगठणात्मक व्यासपिठा मार्फत समाजाच्या बंधुभगिनीनी निस्वार्थ सेवा देणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार )महासंघाचे राष्ट्रीय महासचिव प्राचार्य खुशाल कटरे(से.नि.)यांनी केले. तिरोडा तालुका मुख्य व महिला कार्यकारीणी च्या वतिने आयोजित पोवार समाजाच्या सहविचार सभेत ते बोलत होते. सहविचार सभेचे आयोजन गुरूवारी ता.21 फेब्रुवारी रोजी संजय कटरे यांच्या निवास स्थानी तिरोडा येथे करण्यात आली होती. श्री कटरे पुढे म्हणाले पोवार समाजातील मुले,मुली शैक्षणिक क्षेत्रात गौरवपूर्ण कामगीरी करीत आहेत. या नविन पिढीला,आपल्या समाजाचे इतिहासीक अस्तित्व, संस्कृती,चाली रिती,रूढी, परंपरा यांचे ज्ञान असने आवश्यक आहे.या साठी त्यांना सामाजिक साहीत्य अभ्यासण्याकरीता पुरविने आवश्यक आहे. हे कार्य सामाजिक संगटने द्वारा केले पाहीजेत. म्हणून सामाजिक संगटना सर्वच बाबतीत प्रबळ असने गरजेचे असते. या प्रसंगी विचारमंचावर कृषीउत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती वाय.टी.कटरे,गोंदिया जिल्हा भाजप चे युवक अध्यक्ष ओम कटरे,गोंदिया जिल्हा महिला कार्यकारीणीच्या उपाध्यक्षा सौ.मेघादिदी सुनिल बिसेन,प्रगतीशील पोवार मंच,रेजाभोज समीती चे अध्यक्ष बाबा भैरम, प्राचार्य श्रीचंद पटले(से.नि.), शिक्षक तारेंद्र रहांगडाले,शिक्षक डी.एस.परीहार, गोंदिया जिल्हा कार्यकारीणी कोषाध्यक्ष आनंद बिसेन इ.मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किशोर पटले यांनी प्रस्तुत केले मान्यवरांच्या वतिने सामाजिक चर्चा झाल्यात. तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी महासंघानी विनंती केलेल्या पत्राला प्रतिसाद देत ,मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास चक्रवर्ती सम्राट राजाभोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव द्या अस्या विनंतीचा पत्र तात्काळ निर्गमीत करून अग्रेसीत केले. याबद्दल भारतातील पोवार (पंवार )समाज आमदार महोदयाचे आभार मानीत अभिनंदन करीत असल्याचा ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला. सामाजीक योगदानाचा संदर्भ घेत राष्ट्रीय महासचिव प्राचार्य खुशाल कटरे (से.नि.)यांच्या प्रभावांने तिरोडा तालुका, गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र राज्य स्तरावरील महासंघ कार्यकारीणीत नविन नियुक्त्या बहाल करण्यात आल्या. या अतंर्गत महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारीणी कोषाध्यक्ष या पदावर वाय.टी.कटरे यांची नियुक्ती,महाराष्ट्र प्रदेश युवक कार्यकारीणी अध्यक्ष या पदावर ओम कटरे यांची नियुक्ती करण्यात आली. गोंदिया जिल्हा मुख्य कार्यकारीणी उपाध्यक्ष या पदी संजय कटरे यांची नियुक्ती करण्यात आली. यांनी मानले. या प्रसंगी प्यारेलाल बिसेन, प्रा.सुनील बोपचे,माजी सैनिक मनोजकुमार ठाकुर, सौ.माधुरी बिसेन, सौ.सुनिता बिसेन, अनिता बोपचे,सुरेंद्र अंबुले,माजी सुभेदार एच.बी.कटरे,दिनदयाल पटले,काफीलाल पटले,ललितकुमार हरिणखेडे, डिलेश पटले,दयानंद पटले,सौ.भारती पटले,सौ.निर्मला बिसेन, सौ.आशा कटरे, श्रीमती देवी हरीणखेडे,डाॅ.मनिषा रहांगडाले,हिवराज कटरे,विनोद हरिणखेडे,प्रकाश कटरे,नान्हुराम चौधरी,गुणीलाल बोपचे,ओंकार पारधी,घनश्याम पटले,हंसराज रहांगडाले,इ.समाज बांधव उपस्थित होते. सहविचार सभेचे सुत्र संचालन तिरोडा तालुका सचिव संजय कटरे तर आभार तिरोडा तालुका अध्यक्ष ललितकुमार रहांगडाले यांनी मानले.