गोंदिया,(दि.२२) : पोवार समाजामध्ये उत्तम कार्य करुन स्वतःला समाज कार्यात सिद्ध करुन समाजात वेगळी ओळख निर्माण केलेले तिरोड़ा तालुक्यातील चिरेखणी गांवातील निवासी युवा नेतृत्व ओम कटरे यांची पोवार समाजाच्या युवा प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समाजामधील खूप महत्त्वाच्या कामाबद्दल आणि समाजाच्या युवकांमध्ये त्यांच्या बद्दल असलेल्या आकर्षणावर पोवार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विशाल बिसेन यांनी दखल घेतली असून त्यांना अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघच्या वतीने हे नियुक्ती करण्यात आलेली आहे. तिरोडा तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये बैठकीचे अध्यक्ष प्राचार्य खुशाल कटरे राष्ट्रिय महासचिव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
ह्यावेळी ओम कटरे यांनी समाजाकरिता आणि समाजाच्या हिताकरिता पूर्ण निष्ठांनी काम करत राहण्याची हमी दिली त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय पोवार समाजाच्या शिर्ष नेतृत्वाला दिलेले आहे. पोवार समाजाच्या गोंदिया जिल्ह्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे.
सदर बैठकीचे संचालन संजय कटरे आणि आभार ललित रहांगडाले यांनी मानले. सदर बैठकित बाबा भैरम, वाय. टी कटरे, श्रीचंद पटले, किशोर पटले राज्य, तारेंद्र रहांगडाले सर, हंसराज रहांगडाले, ओंकार पारधी, महेंद्र ठाकूर, घनश्याम पटले,उपाध्यक्ष, मेघा बिसेन, आशा कटरे, मनीषा रहांगडाले आदी उपस्थित होते.

